IND vs ENG: सेमीफायनल सामन्याआधी आली वाईट बातमी! ‘हा’ गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात आज अॅडलेडमध्ये खेळल्या जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. सामन्याच्या काही तास आधी एक मोठी बातमी समोर येत आहे. सामन्यापूर्वी इंग्लंड संघाकडून ही वाईट बातमी समोर येत आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे या उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडला या सामन्यात खेळणे कठीण दिसत आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार मार्क वुड भारताविरुद्ध खेळू शकणार नाही. मार्क वुडने या स्पर्धेत आतापर्यंत 4 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये मार्क वुडने 154.74kph च्या वेगाने सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, इंग्लंड संघाने मार्क वुडच्या बदलीची तयारीही केली आहे. मार्कच्या जागी क्रिस जॉर्डनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्याची योजना संघ व्यवस्थापनाने आखली आहे. ख्रिस जॉर्डनने या टी-20 विश्वचषकात अद्याप एकही सामना खेळलेला नाही. ख्रिस जॉर्डनने इंग्लंडसाठी एकूण 82 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 90 विकेट घेतल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *