Indian Economy : २०२७ पर्यंत भारत बनणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० नोव्हेंबर । भारत हा २०२७ पर्यंत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था (Indian Economy) बनणार असल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. अमेरिकन एजन्सी मॉर्गन स्टॅनलीने भारतासंदर्भात ही भविष्यवाणी केली आहे. मॉर्गन स्टॅनली ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक व्यवस्थापन आणि वित्तीय सेवा देणारी कंपनी आहे.

मॉर्गन स्टॅनली या कंपनीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारताचा सध्याचा जीडीपी ३.४ ट्रिलियन डॉलर इतका आहे. तो पुढील दहा वर्षात ८.५ ट्रिलियन डॉलर इतका होणार आहे. म्हणजेच आत्ताच्या जीडीपीच्या तुलनेत भारताच्या जीडीपीत दुपटीने वाढ होणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, पुढच्या काही वर्षात दरवर्षी भारताच्या जीडीपीत 400 अब्ज डॉलरची वाढ होईल. भारतापेक्षा अमेरिका आणि चीन या दोन देशांचा जीडीपी सर्वाधिक (Indian Economy) राहणार असल्याचेही यामध्ये म्हटले आहे.

अमेरिकन एजन्सीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल जगात तिसऱ्या क्रमांकावर असेल. अहवालानुसार, 2032 पर्यंत, भारतीय बाजाराचे भांडवल $3.4 ट्रिलियन वरून $11 ट्रिलियन पर्यंत वाढेल आणि भारत हा जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ (Indian Economy) बनेल, असेही स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *