ड्रग्जमुळे संघाने काढून टाकलेला खेळाडू ठरला विजयाचा हिरो, ३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर केला धमाका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ नोव्हेंबर । भारत विरुद्ध इंग्लंड या टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने भारताचा गोलंदाजांना स्लो कि पालो करून सोडले. शेवट्पर्यंत भारताला एकही विकेट न घेता हार मानावी लागली. इंग्लंडच्या या सामन्यातील पहिले अर्धशतक करणाऱ्या सलामीवीराला ड्रग्स केसमुळे संघातून वगळण्यात आले होते.

इंग्लंडकडून सलामीसाठी कर्णधार जॉस बटलर आणि ॲलन हेल्स हे दोघे आले होते. या दोघांनी श्वेतपर्यंत क्रीझवर राहत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. काही महिन्यांपूर्वी इंग्लंडच्या टी-२० विश्वचषक मोहिमेच्या नियोजनात ॲलेक्स हेल्सचा सहभागही नव्हता पण आता तो या स्पर्धेत संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. ‘रिक्रिएशनल’ ड्रग्स चाचणीत अपयशी ठरल्यामुळे हेल्सला इंग्लंडच्या २०१९ विश्वचषक संघातून वगळल्यानंतर त्याने क्रिकेटच्या मैदानाबाहेर तीन वर्षे घालवली.

बेअरस्टोच्या जागी संधी

हेल्स चार आठवडे आपल्या मैत्रिणीसोबत केपटाऊनमध्ये सुट्टीवर होता आणि त्याच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. सप्टेंबरमध्ये गोल्फ खेळताना जॉनी बेअरस्टोला घोट्याला गंभीर दुखापत झाली आणि तो टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला, त्यामुळे डावाची सुरुवात करण्यासाठी संघात स्थान रिक्त झाले होते आणि ॲलेक्सला संधी मिळाली. त्याने ती संधी उचलून धरली आणि टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी उपांत्य फेरीत भारताविरुद्ध ४७ चेंडूत नाबाद ८६ धावा करून चमकदार कामगिरी केली.

इंग्लंडने १० गडी राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला असून रविवारी त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. २०११ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण करणारा ३३ वर्षीय खेळाडू म्हणाला, “मी पुन्हा विश्वचषकात खेळेन असे मला कधीच वाटले नव्हते आणि संधी मिळणे ही एक विशेष भावना आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *