Nitin Gadkari : देवेंद्र फडणवीस स्टेजवर असतानाच नितीन गडकरींच ते वक्तव्य चर्चेत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ नोव्हेंबर । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या भाषण शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. ते जे बोलतात त्या दिशेने वाटचाल करतात असे ते नेहमी भाषणातून बोलून दाखवत असतात. दरम्यान ते त्यांच्या होमपीचवरील दौऱ्यावर आहेत. नागपुरातील सौंदर्यीकरणाच्या कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाला आले होते यावेळी त्यांनी आयुर्वेदाविषयीच्या विषयीच्या महत्वाबद्दलही माहिती दिली. तसेच या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, मला मत दिले तरी ठीक किंवा नाही दिले तरी ठीक. मी सर्वांसाठी काम करतच राहणार. खासदार कोणीही असो त्याने लोकांची कामे केलीच पाहिजेत, शहराचा विकास करताना मी काम करणाऱ्यांच्या मागे असतो. जे काम करत नाहीत त्यांना त्यांची चूक दाखवत ठोकण्याचे काम करतो. जे काम हाती घेतले आहे ते काम चांगले झालेच पाहिजे असा माझा आग्रह असतो.

ताजबागमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे. येथे रुग्णालय उभे करायचे आहे. अनेक लोक येथे बाहेरून येतात त्यांना चांगली आरोग्य सुविधा द्यायची आहे असेही गडकरी म्हणाले. राजकारण हा पैसे कमविण्याचा धंदा नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना ईश्वर सर्वकाही देत असतो. आपली फक्त त्यावर श्रद्धा असायला हवी. ताजुद्दीनबाबा कुठल्याही एक धर्माचे नाहीत ते सगळ्यांचे आहेत असे नितीन गडकरी म्हणाले. या ठिकाणी येणारा पैसा हा ताजुद्दीनबाबांचा आहे त्यामुळे येथे कुठलाही भ्रष्टाचार होता कामा नये असे नितीन गडकरी म्हणाले.

गडकरी यांनी काँलेज जीवनातील आठणींना उजाळा देत म्हणाले की, माझे मित्र जयंत हे अभ्यासात हुशार होते मात्र मी वेगळ्याच कामात असायचो, परंतु मी विध्यार्थी सेनेचे काम करत होतो मला आतापर्यंत 3 डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आणि पुन्हाही मिळणार आहे. मात्र मी डॉक्टर शब्द लावायला थोडं मागे असतो अनेक डॉक्टर आपल्या पॅथीमध्ये काम करतात आणि अध्ययन सुद्धा करतात मात्र ग्रामीण भागात काही डॉक्टर वेगवेगळ्या पॅथी उपचार करतात ते योग्य नसल्याचे ते म्हणाले.

आयुर्वेदाविषयी बोलताना ते म्हणाले, मला कफ झाला तेव्हा मी आयुर्वेद डाक्टरकडे उपचार केले आणि मला फायदा झाला. लोकांना आराम मिळणे हा महत्वाचा विषय आहे. संस्कृत आणि आयुवेद याला जर्मनीत मोठं महत्व आहे. जगाला सुद्धा आमच्या आयुर्वेदाला महत्व आहे, आम्हाला विश्वगुरु व्हायचं आहे त्यासाठी ज्ञान महत्वाचं आहे ते ज्ञान कुठून घ्यायचं ते ज्याला त्याला ठरवायचं आहे. त्यासाठी अभ्यास फार महत्त्वाचं आहे रिसर्च मोठ्या प्रमाणात होतात मात्र ते सिक्रेट ठेवलं का जात माहीत नाही त्यावर चर्चा झाली पाहिजे असे ते म्हणाले.

मी लघु व सुष्म विभागाचा मंत्री होतो तेव्हा आम्ही मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर विशाखापट्टणममध्ये बनविले त्याचा वापर कोरोना काळात झाला. रामदेव बाबा यांनी आयुर्वेदच्या माध्यमातून जगातील मोठ्या कंपन्यांचा बँड वाजविला आहे. यावरून दिसून येत आपलं आयुर्वेद किती महत्वाचं आहे.

आयुर्वेद रुग्णालयांची संख्या वाढत आहे मात्र त्यात उपचार करणारे ज्ञानी डॉक्टर सुद्धा असायला पाहिजे. जगाने आपल्याला स्वीकारण्यासाठी आपल्याला त्या स्टॅंडर्डमध्ये मार्केटमध्ये यावं लागेल. राजकारणात चमकेश्वर खूप असतात पण तुमच्या कामात ते असायला नको तिथे व्हिजन आणि रिझल्टच पाहिजे असल्याचे गडकरी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *