महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ नोव्हेंबर । टाटा पॉवरची उपपंपनी असलेली टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड (टीपीआरएल) महाराष्ट्रात सोलापूर येथे तब्बल 150 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. सदरचा प्रकल्प पुढील 18 महिन्यांत उभारत वीजनिर्मिती सुरू होणार आहे. त्यासाठी महावितरणने टाटा पॉवरला ‘लेटर ऑफ अॅवॉर्ड’ दिले आहे.
महावितरणने आपले अपारंपरिक ऊर्जा वापराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीवर भर दिला जात आहे. त्यानुसार सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी महावितरणने टेंडर मागवले होते. त्यामध्ये टीपीआरएलला सदरचे टेंडर मिळाले. वीज खरेदी करार लागू करण्यात आलेल्या तारखेपासून 18 महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरू करावा लागणार असल्याचे टीपीआरएलचे सीईओ आशीष खन्ना म्हणाले. या प्रकल्पामुळे आता टीपीआरएलची एकूण अपारंपरिक ऊर्जा क्षमता 5786 मेगावॅटवर पोहोचणार आहे.