महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ नोव्हेंबर । भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ सुरूच आहे. आज व्यवहाराच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी सकाळी सोन्या-चांदीच्या दरात शुक्रवारच्या तुलनेत वाढ झाली आहे. ताज्या अपडेटनुसार, ९९९ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ५२ हजार रुपयांच्या पार गेली असून एक किलो चांदीचा भाव ६१ हजारांच्या पुढे पोहोचला आहे.
आजचे सोने-चांदीचे भाव
ibjarates.com नुसार ९९९ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत ५२,५६० रुपये आहे. तर ९९५ शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याचा भाव ५२,३५० रुपयांवर गेला पोहोचला आहे. ९१६ शुद्धतेचे सोने आज ४८१४५ रुपये तर ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ३९,४२० रुपये इतका झाला आहे. त्याचवेळी ५८५ शुद्धतेचे सोने आज महाग होऊन ३०,७४८ रुपयांत विकले जात आहे. याशिवाय ९९९ शुद्धतेची एक किलो चांदी आज किरकोळ घसरणीसह ६१,५०० रुपयांवर पोहोचली आहे.
सोन्या-चांदीच्या दरात काय बदल झाला?
९९९ शुद्धतेचे १० ग्रॅम सोने आज २७९रुपयांनी महागले असून ९९५ शुद्धतेचे १० ग्रॅम सोने आज ७६० रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर ९१६ शुद्धतेचे सोने २७८ रुपयांनी, ७५० शुद्धतेचे सोने २५६ रुपयांनी आणि ५८५ शुद्धतेचे सोने १६४ रुपयांनी महागले आहे. दुसरीकडे, एक किलो चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज ते १४६ रुपयांनी महागले आहे.
मात्र, लग्नसराईच्या काळात तुम्हाला सोने-चांदी स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी अजूनही आहे. सोने आजही ३६००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १८,००० रुपये प्रति किलोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. सराफा बाजारातील तज्ज्ञांनुसार येत्या काही दिवसांत सोन्याबरोबरच चांदीच्या दरात आणखी वाढ होणार असून या दोन्हीच्या वाढत्या किमती पुन्हा एकदा विक्रमी किमतीचा पल्ला गाठू शकतात.
ग्राहकांनी लक्षात घ्या की सोने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा ३,६४० रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त होत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या किंमतींनी सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव ६०० रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदीला त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे १८,४८० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. चांदीने ७९,९८० रुपये प्रति किलोची आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. अशा परिस्थितीत, जे ग्राहक सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी ही खरेदीची चांगली संधी असू शकते.