महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १४ नोव्हेंबर । ‘माझ्यावर खुनाचंही षडयंत्र त्यांनी रचलं होतं, त्याचं वाईट वाटलं नाही. पण माझ्याविरोधात विनयभंग 354 कलम लावले गेले, याचे वाईट वाटतंय, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड भावुक झाले. इतक्या खालच्या स्तरावर राजकारण सुरू आहे, मला विनयभंगाचा गुन्हा मान्य नाही, असंही आव्हाड म्हणाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याबद्दल दोन्ही नेत्यांनी निषेध व्यक्त केला.
‘राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजेत. त्यांच्या डोळ्यांसमोर सगळा प्रकार झाला आहे. प्लॅन करून हे सगळं केलं जातंय कोण अडचणीत आणतंय हे दिसतंय. ३५४ हा गुन्हा मला अमान्य आहे. समाजात माझी मान खाली झाली. हा षड्यंत्राचाच भाग आहे. परवा सुद्धाच असंच करून मला अटक केली. खोटा गुन्हा दाखल केला गेला. सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार काही केलं नाही. ३५४ चा गुन्हा दाखल झाल्यावर याच्यात न राहिलेलं बरं. ३५ वर्ष राजकरणात मी आहे इतक्या खालचं राजकरण पाहिलं नाही, असं म्हणत आव्हाड भावुक झाले.
‘जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा माझ्याकडे दिला आहे त्यांनी राजीनामा देऊ नये अशी माझी भूमिका आहे. शरद पवार यांच्याशी चर्चाकरून निर्णय घेतला जाईल. जितेंद्र आव्हाड या आरोपामुळे व्यथित झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरूद्ध जितेंद्र आव्हाड असं चित्र दिसत आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
‘राजीनामा देण्याचा निर्णय आव्हाड यांनी घेतला मी त्यांची समजूत घालण्यासाठी येथे आलो. मी माहीत घेतली , काही क्लिप पाहिल्या. या आधी एका कार्यक्रमामध्ये त्यांना भगिनी म्हणून संबोधतात. ‘हमारी बहेन मुंबई से आती है ‘ असं वाक्य आहे. आव्हाड यांनी बाजूला व्हायला सांगितलं त्यात वेगळी कोणतीच गोष्ट नाही, असा सवाल पाटील यांनी केला.
‘माझा राज्य सरकार आणि पोलिसांना प्रश्न आहे. काल झालेली घटना ही 354 मध्ये कुठे बसते हे दाखवून द्या.महाराष्ट्र पोलीस आणि ठाणे पोलिसांनी हे प्रकरण या गुन्ह्यात कसं बसवलं, कायद्याची मोडतोड कशी होते. गृहमंत्र्यांनी नेमकं काय सुरू आहे, ते बघावं,असा टोलाही पाटील यांनी लगावला.
मुख्यमंत्री गाडीत आहेत. पोलीस अधिकारी आणि पोलीस बंदोबत असताना विनयभंग कसा होईल, असा सवालही पाटील यांनी केला.