IRCTC Gujrat Package : केवळ सतरा हजारात फिरा गुजरात; 9 दिवसाचे पॅकेज ऐकाल तर त्वरीत बुकिंग कराल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ नोव्हेंबर । गुजरात हे व्यावसायिकांचे शहर म्हणून प्रसिद्ध असले तरी तिथे नव्याने टूरिस्ट पॉईंट विकसित केले जात आहेत. त्यामूळे तिथे पर्यटकांची ओघ वाढतच आहे.तूम्हालाही गुजरात टूर करायची असेल तर आईआरसीटीसीने नव्या कोऱ्या स्वस्त आणि मस्त पॅकेजची घोषणा केली आहे.

आईआरसीटीसी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमी वेगवगेळ्या बजेटमध्ये विविध प्रकारचे पॅकेज घेऊन येत असते. त्यामूळे अनेक दिवस पेंडींग राहीलेले ट्रिपचे प्लॅन्स आता पूर्ण केले जात आहेत. जर तुम्हाला गुजरातला भेट देण्याचा विचार करत असाल तर तूमच्यासाठीच हे पॅकेज आहे.

तुम्हाला स्वस्तात गुजरातला जायचे असेल तर IRCTC तुमच्यासाठी एक उत्तम टूर पॅकेज घेऊन आले आहे. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही फक्त 17 हजार रुपयांमध्ये गुजरातला भेट देऊ शकता. हे टूर पॅकेज ९ दिवसांचे असून यामध्ये प्रवाशांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था फ्रिमध्ये केली जाणार आहे.

IRCTC प्रवाशांसाठी विविध कमी खर्चिक टूर पॅकेजेस ऑफर करत आहे. यामध्ये पर्यटक वेगवेगळ्या शहरांना भेटी देऊ शकतात. त्यामूळे पर्यटनलाही चालना मिळते. आता IRCTC ने गुजरातसाठी नवीन टूर पॅकेज आणले आहे. हे प्रवाशांना गुजरातमधील प्रमुख पर्यटन स्थळे अतिशय स्वस्तात पाहता येणार आहेत.

IRCTC चे गुजरात पॅकेज 21 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. या टूर प्रवासाची सुरूवात बिलासपूर स्टेशनपासून सुरू होईल. ग्रँड टूर ऑफ गुजरात एक्स बिलासपूर असे या टूर पॅकेजचे नाव आहे. हे टूर पॅकेज 9 दिवस आणि 8 रात्रीचे आहे.

ज्यामध्ये प्रवासी गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी, भुज, कच्छचे रण, द्वारका, सोमनाथ आणि अहमदाबाद यासारख्या ठिकाणांना भेट देण्यात येणार आहे. प्रवासी ट्रेनच्या थर्ड एसी आणि स्लीपर कोचमधून प्रवास करता येणार आहे. प्रतिव्यक्ती १७,०३५ रुपये खर्च येणार आहे.

गुजरातच्या या स्वस्त टूर पॅकेजमध्ये प्रवासी त्यांच्या बजेटनुसार स्लीपर क्लास आणि कम्फर्ट क्लासमध्ये प्रवास करू शकतात. प्रवाशांना नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची सुविधा मिळणार आहे.

प्रवासी या पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइट www.irctctourism.com द्वारे बुकींग करू शकतात. तसेच इथे सविस्तर माहितीही घेता येईल. याचे बोर्डिंग, डि-बोर्डिंग पॉइंट विलासपुर-रायपुर-दुर्ग- भंडारा रोड आणि नागपुर हे आहेत. तूम्हालाही एवढ्या कमी खर्चात गुजरात अनूभवायचे असेल तर आजच हि टूर बुक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *