महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ नोव्हेंबर । काही दिवसांआधी शिर्डीत राष्ट्रवादीचं (NCP) शिबीर पार पडलं. या शिबीरादरम्यान अजित पवार दिसले नाहीत. त्यानंतर अजित पवार नाराज असल्याचं बोललं गेलं. त्यावर अजित पवार यांनी आज स्पष्टीकरण दिलं. या शिबीरादरम्यानच्या काळातच माझा बाहेरचा दौरा आयोजित होता. तो कौटुंबिक पातळीचा दौरा होता. त्याला मला नकार देता आला नाही. या नंतर लगेच माझ्या नाराजीच्या बातम्या समोर आल्या. पण त्यात काहीही तथ्य नाही, असं म्हणत आपण नाराज नसल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं.