Shraddha Murder Case: “…आणि ती रडू लागली”; आठवडाभर आधीच श्रद्धाचा खून करण्याचा आफताबचा प्लॅन होता पण…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ नोव्हेंबर । वसईतील श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीची दिल्लीमध्ये तिच्याच प्रियकराने हत्या केल्यानंतरचा धक्कादायक घटनाक्रम सध्या चर्चेत आहे. श्रद्धाचा प्रियकर आफताब अमीन पूनावालाने श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केला. शनिवारी आफताबला अटक करण्यात आल्यानंतर रोज नवीन नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच आता आफताबने श्रद्धाचा खून करण्यामागे नेमकं काय कारण होतं याबद्दलचा खुलासा करतानाच श्रद्धाला १८ मेच्या आधीच संपवण्याचा डाव होता असंही सांगितलं आहे. लग्नावरुन दोघांमध्ये वाद झाल्यानंतर गळा वाळून आफताबाने श्रद्धाचा खून केला. अशाच प्रकारचा वाद खूनाच्या दहा दिवस आधी झाला होता. त्यावेळेसही श्रद्धाला संपवण्याचा विचार आपल्या डोक्यात आला होता असं आफताबने कबुली जबाबामध्ये म्हटल्याचं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

“त्याचवेळी मी तिला ठार मारणारच होतो पण ती फार भावूक झाली आणि रडू लागली. त्यामुळे मी तेव्हा काहीही केलं नाही,” असं आफताबने पोलिसांना सांगितलं. प्रेयसीची हत्या करणाऱ्या २८ वर्षीय आफताब अमिन पूनावाला याला दिल्ली पोलिसांनी मंगळवारी दक्षिण दिल्लीच्या छतरपूरच्या जंगलात नेले. याच जंगलात आपली प्रेयसी श्रद्धा वालकरच्या शरीराचे तुकडे फेकून दिल्याचे आफताबने पोलिसांना सांगितले होते. पोलिसांकडून श्रद्धाच्या अवयवाच्या तुकड्यांचा सुमारे तीन तास शोध घेण्यात आला. दिल्ली पोलिसांना वेगवेगळय़ा ठिकाणांहून मानवी शरीराचे १३ तुकडे सापडले असून ते डीएनए चाचणीसाठी पाठवले जाणार आहेत. न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून ते तपासले गेल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *