उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फटकारलं ; ‘स्वातंत्र्य लढ्यात नसणाऱ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलू नये’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । ‘ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, आज ते धोक्यात आले म्हणून आम्ही लढा सुरू केला आहे. एकत्र आलो आहोत. जो पांचटपणा सुरू केला आहे, तो त्यांनी बंद करावा, पहिल्या आपल्या संस्थेचं स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे, ते सांगावे मग पुढे बोलावं. त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये, अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर येऊन बाळासाहेबांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्टुन्स कट्टाला भेट दिली. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीस आणि भाजपवर जोरदार प्रहार केला.

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल विधान केलं, तिथे आदित्य ठाकरे यात्रेत होते. फडणवीस यांनी विधान उपस्थितीत केलं, बरं झाले ते बोलले, ‘सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि प्रेम आहे. कुणी कितीही प्रयत्न केला, तो पुसायचा प्रयत्न जरी केला तरी पुसली जाणार नाही. तो कायम असणार आहे. सावरकर यांच्याबद्दल कुणी प्रश्न विचारावा, यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही, त्यांच्या मातृसंस्थेनं आणि त्यांच्या पिल्लांनी प्रेम व्यक्त करणे हे व्यक्त करणे हास्यास्पद आहे. ते म्हणतील आम्ही कुठे होतो, तर आम्ही नव्हतो. पण संघ तेव्हा सुद्धा होता. पण स्वातंत्र्य लढ्यापासून 4 हात लांब होते. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलू नये’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना फटकारलं.

 

ज्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, आज ते धोक्यात आले म्हणून आम्ही लढा सुरू केला आहे. एकत्र आलो आहोत. जो पांचटपणा सुरू केला आहे, तो त्यांनी बंद करावा, पहिल्या आपल्या संस्थेचं स्वातंत्र्य लढ्यात काय योगदान आहे, ते सांगावे मग पुढे बोलावं, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

ज्या प्रमाणे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेले. त्याच केंद्र सरकारला आणि पंतप्रधान मोदी यांना भारतरत्न देण्याचा अधिकार आहे. 8 वर्ष झाली सावरकर यांना भारतरत्न का दिले नाही. पहिले सावरकर यांचे विचार जोपसण्याचं शिका. पाकव्याप्त काश्मिरमधील एक इंच जमीन सुद्धा भारतात आणू शकले नाही, त्यांनी स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याचं धाडस करू नये, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

‘आज 10 वर्ष पूर्ण झाली आहे. शिवसेनाप्रमुख हे शिवसेनाप्रमुखच आहे. यंदाचा शिवसेनाप्रमुखांचा स्मृतीदिन आज वेगळा वाटत आहे. 10 वर्षांनंतर सुद्धा शिवसेनाप्रमुख हे त्यांना समजत नाही. त्यांचा वाद आज काढला आहे. त्यांच्याबद्दल प्रेम आणि भावना व्यक्त करत असताना काही चुकीचे नाही. पण ते करत असताना त्याचा कुठे बाजार होऊ नये, अशी माझी भावना आहे. त्यातच बाजारीकरण होता कामा नये. ते करत असताना त्यात एक कृती असली पाहिजे. जर कृती नसेल तर ती भावना नसते. बाळासाहेबांच्या नावाचा कुणी बाजार मांडू नये, त्यांना साजेशीर काम करावे. हीच विनंती आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

राष्ट्रीय स्मारकाचा फडणवीस यांनी आढावा घेतला, त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘काही वेळा असं असतं की, बाळासाहेबांच्या जिवनावर संजय राऊत यांनी चित्रपट काढला. पण त्यात कुठेही राऊत दिसले नाही. पण काही जणांनी सिनेमा काढला आणि स्वत: चं कौतुक करून घेतलं. बाळासाहेबांचं स्मारक हे त्यांच्या आयुष्याबद्दल आहे, जे कुणी बघायला येईल. ते प्रेरणा घेऊन जाईल. त्यामुळे कारण नसताना कुणीही डोकावू नये. त्यांनी अनेक वेळा स्मारक होईल असं म्हटलं आहे पण कधीच काही झालं नाही. भाजपला सगळ्यांचा ताबा हवा आहे,पण तो द्यावा की नाही, ते जनता ठरवेन. तिथे स्मारकाचं का आहे. भाजपला सर्व आपल्या बुडाखाली हवं आहे. त्यांचे हे मनसुबे आहे. मनात कितीही मांडे मांडले तरी लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *