‘त्या’ प्रश्नांमुळे पारा चढला अन् सगळंच संपलं ; श्रद्धा-आफताबच्या वादामागे वेगळंच कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । मूळची वसईची रहिवासी असलेल्या २६ वर्षीय श्रद्धा वालकरची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या झाली. श्रद्धाचा २८ वर्षीय प्रियकर आफताब पुनावालानं तिची अत्यंत निर्दयीपणे संपवलं. श्रद्धा आणि आफताब लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. त्यांच्या कुटुंबियांना प्रेमसंबंधांना विरोध होता. त्यामुळे दोघे मुंबई सोडून दिल्लीला आले. महरौली परिसरात भाड्यानं फ्लॅट घेऊन ते राहत होते.

१८ मे रोजी आफताबनं श्रद्धाची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते ठेवण्यासाठी ३०० लीटर क्षमतेचा फ्रीज आणला. त्यानंतर अनेक दिवस आफताब रोज रात्री २ वाजता बाहेर पडायचा आणि एक-एक तुकडा जंगलात फेकून परत यायचा. श्रद्धानं आफताबकडे लग्नाचा आग्रह धरला होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्याच वादात आफताबनं श्रद्धाचा जीव घेतल्याची माहिती आधी समोर आली होती. मात्र आता वेगळाच तपशील पुढे आला आहे.

हत्येआधी श्रद्धा आणि आफताबमध्ये वाद झाला. मुंबईहून सामान कोण शिफ्ट करणार, घर चालवण्यासाठी येणारा खर्च कोण उचलणार यावरून वाद सुरू होता. यावरून बराच वेळ दोघांचं भांडण झालं. यानंतर आफताबनं श्रद्धाला संपवलं. याआधीही दोघांमध्ये अनेकदा वाद झाले. मात्र १८ मे रोजी झालेला वाद त्यांच्यातला अखेरचा वाद ठरला.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी झालेलं भांडण मुंबईवरून सामान कोण शिफ्ट करणार या विषयावरून झालं होतं. घरचा खर्च कोण करणार, सामान कोण आणणार यावरून दोघे भांडत होते. आफताब यावरून नाराज झाला. १८ मे रोजी रात्री ८ वाजता दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर आफताबनं श्रद्धाची हत्या केली. रात्रभर मृतदेह बाथरुममध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी त्यानं फ्रीज आणि चाकू खरेदी केला. चाकूच्या मदतीनं त्यानं मृतदेहाचे तुकडे केले आणि ते पॉलिथीन बॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *