महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका दुबई मधल्या राम मंदिराच्या भेटीस जाणार आहेत. कार्तिकी एकादशी निमित्त या सोहळ्याचे नियोजन संत ज्ञानोबा तुकोबा विश्वभ्रमण दिंडी यांनी केले आहे
२० नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत ही दिंडी आळंदी – पुणे – दुबई – राम मंदिर – बरजूमान – अबुदाबी – शारजाह- पुणे – आळंदी अशा प्रकारे हे भ्रमण असेल. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रथमच विदेशात जाण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले असे आयोजांकडून सांगण्यात आले.