Notice Period Rule: खासगी कंपनीत नोटीस पीरिअड बाबत काय आहेत नियम ? जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ नोव्हेंबर । Notice Period Rule: जेव्हा नोकरी बदलण्यासाठी राजीनामा देतात, तेव्हा त्यांना विद्यमान कंपनीमध्ये नोटीस पीरिअड पूर्ण करावा लागतो. नोटीस पीरियड देण्याचा नियम जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये आहे. तथापि, नोटिस पीरिअड सेवा कालावधी कंपनीनुसार बदलते.नोटीस पीरिअड न देताही तुम्ही नोकरी सोडू शकता. परंतु यासाठी तुम्हाला निश्चित नियमांचे पालन करावे लागेल, जे आर्थिक दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यासाठी फायदेशीर नाही. म्हणूनच राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे. नोटीस कालावधीबाबत काय नियम आहेत ते समजून घेऊ.

जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत नोकरीला जाल तेव्हा तुम्हाला अनेक प्रकारच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करायला सांगितली जाते. यामध्ये कंपनीच्या पॉलिसीसह काम करण्याच्या अटींचाही समावेश असतो. यामध्ये तुम्हाला नोटीस पीरिअडची माहिती मिळते.नोटीस कालावधी संबंधित सर्व माहिती त्यात लिहिलेली असते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला कमी नोटीस पीरिअड द्यायचा असेल, तर त्यासाठी कोणत्या अटी आहेत? जर तुम्हाला नोटीस पीरिअड द्यायचा नसेल, तर तुम्हाला कोणत्या अटींचं पालन करावे लागेल? अशा सर्व गोष्टी तुम्हाला कागदपत्रांमध्ये सापडतील.

कंपन्या नोटीस पीरियडचा नियम ठेवतात जेणेकरुन जर कोणी नोकरी सोडली तर त्याची बदली नोटिस पीरिअडमध्येच मिळू शकेल. त्यामुळे कंपनीच्या कामावर परिणाम होत नाही. त्यांनी राजीनामा देताच कंपनी नवीन उमेदवार शोधू लागते.नोटीस पीरिअडचा कोणताही निश्चित नियम नाही. प्रत्येक कंपनी आपल्या कराराच्या धोरणात याचा उल्लेख करते. साधारणपणे, तात्पुरत्या स्वरूपात घेतलेल्या कर्मचार्‍यांसाठी (Employee on Probation) नोटिस पीरिअड 15 दिवसांपासून एक महिन्यापर्यंत असतो, तर कायम असलेल्या कर्मचार्‍यांसाठी (Payroll Employees) नोटिस पीरिअड दोन ते तीन महिने असतो.

जर तुम्ही नोकरीत रुजू होताना नोटिस पीरिअड असलेल्या करारावर स्वाक्षरी केली असेल तर तुम्हाला कंपनीच्या त्या धोरणाचे पालन करावे लागेल. कारण तुम्ही जॉईन होताना यासाठी संमती दिली आहे. अशा परिस्थितीत, तुमच्यासाठी नोटीस पीरिअड पूर्ण करणे आवश्यक आहे. तथापि, कोणतीही कंपनी कर्मचार्‍याला नोटीस पीरिअडसाठी सक्ती करू शकत नाही. नोटिस पीरिअड पूर्ण न करण्याच्या अटी देखील सामान्यतः तुमच्या नोकरीच्या करारामध्ये लिहिलेल्या असतात.

नोटिस पीरिअडच्या बदल्यात तुमच्या सुट्ट्या (Earned & Sick Leaves) समायोजित करण्याचे नियम देखील आहेत. याशिवाय, नोटीस पीरिअडच्या बदल्यात पेमेंट करण्याचा पर्याय देखील समाविष्ट आहे. तुम्हाला मूळ वेतनाच्या आधारे पैसे द्यावे लागतील. अनेक कंपन्या नोटीस पीरिअड बाय आऊट सुद्धा करतात. तुमच्या पगाराचे उर्वरित पेमेंट किंवा तुमच्या नोटिस पीरिअडच्या बदल्यात केलेले पेमेंट कंपनी फूल अँड फायनलद्वारे (FnF पेमेंट) करते. तथापि, कोणत्याही प्रकारच्या कनफ्युजनच्या स्थितीत आपण आपल्या कंपनीच्या एचआरशी चर्चाही करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *