महाराष्ट्र २४- ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – सातारा : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने जगभर थैमान घातले आहे. या महामारीच्या काळात सध्या देशभर लॉक डाऊन सुरू आहे. मात्र या लॉक डाऊनमध्ये राज्य सरकारने दारू दुकाने सुरू करण्याचा निव्वळ मूर्खपणा केलेला आहे. केवळ सरकारला यामधून महसूल मिळतो. सरकारच्या तिजोरीत भर पडते. म्हणे यामुळे देशाची, राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होते. मात्र याचा किती भयंकर परिणाम झाला हे लॉक डाऊनमध्ये पहायला मिळाले. यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांना शेतात गांजा, आफू लावण्यास परवानगी द्यावी. व त्याद्वारे सरकारने महसूल मिळवावा, शेतात गांजा पेरण्याची परवानगी का देऊ नये? त्याद्वारेही राज्याला महसूल मिळेल आणि शेतकऱ्यांना पैसाही मिळेल. असा सल्ला श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष तथा नमो नमो मोर्चा (भारत)चे सातारा जिल्हा अध्यक्ष मदन साबळे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
दारूची दुकाने सुरू केल्यानंतर तळीरामांनी चक्क 5 किलोमीटरपर्यंत रांगा लावल्याचे चित्र सांगलीमध्ये पहायला मिळाले होते. सोशल डिस्टनिंगचा पुरता फज्जा उडवला या तळीरामांनी. राज्याची अर्थ व्यवस्था मजबूतच करायची असेल तर शेतकऱ्यांना गांजा, अफूची लागवड करण्यास परवानगी का देऊ नये? असाही सवाल यावेळी साबळे यांनी केला आहे.