फेसबुक वर देवेंद्र फडणवीसां विरोधात पोस्ट लिहिणं महागात; पुण्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ नोव्हेंबर । भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह शब्दांत पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पुण्यातील लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ अंतर्गत हा गुन्हा दखल करण्यात आला आहे. अनिल हरपळे असं या व्यक्तीचे नाव असून तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची साथ सोडून महविकास आघाडी स्थापन केली. ठाकरे यांनी घेतलेल्या या निर्णयाची सल अजूनही भाजपच्या मनात कायम आहे. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच ट्वीट करत उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं होतं की, ‘तुमच्यासोबत २४ तास असणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो. तुम्ही माझ्याशी बेईनामी कराल तर मी बदला नक्कीच घेईन. बेईमानाला जागा दाखवावी लागते दाखवली. होय मी बदला घेतला.’ फडणवीस यांच्या या ट्वीटला अनिल हरपळे यांनी उत्तर दिले होते.

देवेंद्र फडणवीसांच्या ट्वीटला उत्तर देताना अनिल हरपळे यांनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यामुळे संतापलेल्या हवेली तालुक्यातील स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप भोंडवे यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यावरून लोणीकंद पोलिसांनी अनिल हरपळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी भाजपचे तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष ओंकार कंद, तालुका युवा मोर्चाचे सरचिटणीस गौरव झुरूंगे, समीर झुरूंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *