नारायण राणे यांचं ‘ते’ विधान लागलं; नीलम गोऱ्हे म्हणाल्या; हे तर …….

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । नीलम गोऱ्हे शिवसेनेत नाराज होत्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. माझ्या शिफारशीमुळे त्या थांबल्या, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे. राणे यांच्या या दाव्याचं नीलम गोऱ्हे यांनी खंडन केलं आहे. राणेंच्या म्हणण्यात काहीही तथ्य नसल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांचं विधान हस्यास्पद आहे. ते चिंटूचे जोक्स आहेत. माझं त्यांच्याशी कधी बोलणंही झालं नाही. तसेच 2004 नंतर मी त्यांना कधी भेटलेही नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. तसेच मी शिंदे गटात जाणार नाही. मला तशी गरजच वाटत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

नीलम गोऱ्हे ट्रायडंट हॉटेलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना भेटल्या. या दोन्ही नेत्यांबरोबर नीलम गोऱ्हे यांची तासभर बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त आहे. काय चर्चा झाली ते कळू शकलं नाही. पण बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी या चर्चांचं खंडन केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाली तेव्हा तिथे ओमप्रकाश बिर्लाही होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही होते. अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याच्या बातम्या आहेत. असे काही नाही. कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी योग्य ती कारवाई व्हावी. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीचं निवेदन नीलम गोऱ्हे यांनी ओम बिर्ला यांना दिलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *