महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १९ नोव्हेंबर । राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाने निषेध केला आहे. इतकी वर्षे काँग्रेस देशामध्ये सत्तेत होते. मात्र भारत जोडोची त्यांना आत्ताच आठवण आली का? यामध्ये ते स्वतःची याता यात करून घेत आहेत. भारत जोडण्यासाठी ते महाराष्ट्रात आले खरे मात्र महाराष्ट्रात नवीन कार्यकर्ते यात्रेत सहभागी झाले नाहीत, असे देखील त्यांनी नमूद करत तेच तेच चेहरे आजूबाजूला दिसत असल्याचे सांगितले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सगळ्या पक्षाचे मिळून सध्या भारत जोडो सुरू असल्याची टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.
या तीन पक्षाची मने जुळलेली नाहीत. सत्तेसाठी फक्त एकत्र येतात. यामध्ये त्यांना काही यश मिळणार नाही. जे कार्य सध्या पंतप्रधान मोदी करत आहेत ते प्रशंसा करण्यासारखे आहे. यामुळे भारताची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे सुरू आहे. जगात असे कर्तृत्वान नेते म्हणून त्यांचा गौरव होतो यापेक्षा आणखी काय हवं असे कौतुकास्पद उदगार त्यांनी पंतप्रधान यांच्याबद्दल काढले.
आदित्य ठाकरे हे बालीश असून सावरकरांचा इतिहास त्यांना आणि त्यांचे वडील उद्धव ठाकरे याना माहिती नाही. त्यामुळे त्यांना राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे गांभीर्य कळले नाही असा, टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला. सावरकरांचे देशासाठी योगदान खूप मोठं असून शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते ते आदित्य ठाकरेंना माहिती नसल्याची खोचक टीका त्यांनी केली. हे फक्त त्या यात्रेत फोटो काढण्यासाठी गेले त्यामुळेच त्यांना या वक्तव्याचे गांभीर्य नसल्याने त्यांना कोणतीही चीड आली नाही का असा सवाल उपस्थित केला
नारायण राणे यांच्या विरोधात नीलम गोरे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत नीलम ताई विसरल्या असतील पण माझ्या शिफारशी शिवाय ताई शिवसेनेत राहिल्याच नसत्या असा गौप्यस्फोट केला. त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या त्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रीपद दिल नाही त्यामुळे देखील ताई नाराज होत्या. मी सांगितल्या नंतर तरी ताईना आठवेल अशी आशा आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.