पेन्शनधारकांसाठी बातमी! उरले फक्त 10 दिवस आजच करा हे काम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २१ नोव्हेंबर । पेन्शनधारकांसाठीनोव्हेंबर महिना खूप महत्त्वाचा आहे. लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर खात्यावर पेन्शन येणार नाही. जर अजूनही पेन्शनधारकांनी हे सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर आजच जमा करा. त्याचं कारण म्हणजे आता नोव्हेंबर महिना संपण्यासाठी फक्त 10 दिवस शिल्लक आहेत. जर अजूनही सर्टिफिकेट जमा केलं नसेल तर लवकर करून टाका.

या आठवड्यात चौथा शनिवार असल्याने बँकबंद राहणार आहे. त्यानंतर रविवार आहे, महिना अखेर असल्याने बँकेत गडबड असू शकते. याच कारणासाठी 5 दिवसात लाईफ सर्टिफेकटची काम तातडीने करून घ्या. आता तुम्हाला बँकेच्या खेटा घालणं जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन देखील लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.

काही बँकांनी व्हिडीओ कॉलद्वारे देखील लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याची सुविधा सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदा, SBI सारख्या बँका ही सुविधा देत आहेत. घरबसल्या व्हिडीओ कॉलच्या मदतीने लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता. तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर नेमकं काय प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे सोप्या शब्दात जाणून घ्या.

ज्यांना वेबसाईटवर जाऊन जमा करायचं आहे़, ते देखील घरबसल्या हे काम करू शकतात. सगळ्यात आधी तुम्हाला बँकेच्या वेबसाइटवर जायचं आहे. तिथे ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र सादर करणे असा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लील करा. त्यानंतर एक नवीन पेज सुरू होईल. या पेजवर तुम्हाला तुमची भाषा निवडायची आहे.

पुढे क्लीक केल्यावर तुम्हाला डिटेल्स अपलोड करायचे आहेत. तुम्हाला बँकेचा अकाउंट नंबर देखील अपलोड करायचा आहे. तिथे दिलेली माहिती अपलोड करा आणि सब्मिट करा.

यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर Bankofbaroda.com क्लिक करा. यानंतर ज्या पीपीओ नंबर आणि अकाउंट नंबरमधून तुमची पेन्शन येते तो नंबर भरा. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीपी येईल, तो अपलोड करा. आधार क्रमांक टाकून सबमिट बटन क्लिक करा

पुढे काही पर्याय निवडावे लागतील. यानंतर कॉल नाऊ किंवा नंतरचा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला बँकेकडून बोलावणं येईल आणि त्यानंतर बीओबी एजंट तुमच्यासमोर येईल. यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आयडी आणि अधिक माहिती भरावी लागेल.

यानंतर बेसच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर पुन्हा ओटीपी मिळेल, जो पुन्हा टाकावा. यानंतर बँकेने आपले जीवन प्रमाणपत्र सादर करावे. मोबाईलवर मेसेज आणि मेलद्वारे तुम्हाला ही माहिती दिली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *