महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ नोव्हेंबर । कारच्या काळ्या खिडक्या (Tinted Car Glass) ठेवणे हे अनेक लोकांना आवडते. म्हणूनच, कारच्या काचांवर काळी फिल्म लावली जाते, पण असे करणे बेकायदेशीर आहे. वाहतूक नियमांनुसार (Traffic Rules), कारच्या आरशांवर झिरो विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावल्यास चलान आहे. कारण, हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या कक्षेत येते. पण, त्यानंतरही तुम्हाला गाडीच्या काळ्या काचा वापरायच्या असतील, तर त्यासाठीही नियम आहे. नियमांचे पालन करून तुम्ही काळ्या काचा ठेवू शकता.
स्वॅग दाखवण्यासाठी काळ्या काचा
अनेक लोक त्यांचा स्वॅग दाखवण्यासाठी त्यांच्या कारच्या काचा काळ्या करतात. यासाठी ते काचेवर ब्लॅक फिल्म वापरतात. त्यामुळे पोलिसांना दंड आकारावे लागत आहे. याशिवाय आजकाल दंडाचीची रक्कमही खूप वाढली आहे. कारच्या काचा पूर्णपणे काळ्या करता येणार नाही, काय आहे नियम? जाणून घ्या या नियमांबाबत
मे 2012 मध्ये सुप्रीम कोर्टाने कारच्या टिंटेड काचेबाबत निर्णय दिला. न्यायालयाच्या निर्णयानुसार, कारच्या पुढील आणि मागील आरशांची विजिबिलीटी किमान 70 टक्के असावी. याचा अर्थ कारच्या पुढील आणि मागील आरशांमधून किमान 70 टक्के प्रकाश आत आला पाहिजे. त्याच वेळी, बाजूच्या काचेची विजिबिलीटी किमान 50 टक्के असावी. याचा अर्थ असा की, कारच्या साइड मिररमधून 50 टक्के प्रकाश आत यावा.
किती विजिबिलीटी असलेली ब्लॅक फिल्म लावू शकता?
जर तुम्हाला तुमच्या कारच्या काळ्या काचा ठेवायच्या असतील, तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. नियमानुसार, तुम्हाला कारच्या बाजूच्या खिडक्यांवर 50 टक्के विजिबिलीटीसह ब्लॅक फिल्म, तसेच पुढील आणि मागील काचेवर 70 टक्के विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावू शकता.
काच ‘इतक्या’ प्रमाणात काळी ठेवू शकता
जर तुमच्या वाहनाच्या काचेचा रंग नियमापेक्षा काळा असेल तर वाहतूक पोलीस तुमचे चलान कापू शकतात. पण जर तुम्हाला ब्लॅक फिल्म लावायची असेल, तर तुम्ही पुढील आणि मागील आरशांवर 70% विजिबिलीटी आणि साइड मिररवर 50% विजिबिलीटी असलेली फिल्म वापरू शकता. असे केल्याने, वाहतूक पोलीस दंड आकारू शकत नाहीत, कारण ते नियमानुसार आहे.