महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ नोव्हेंबर । सध्या देशभरात श्रद्धा हत्याकांडप्रकरणानंतर (Shraddha Murder Case) तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्याचदरम्यान आज (22 नोव्हेंबर) आफताबला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले असताना त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याने न्यायालयात सांगितले की, ही घटना रागाच्या भरात, काही क्षणात घडली. त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. यानंतर दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आफताबच्या पोलीस कोठडीत पुढील 4 दिवसांची वाढ केली आहे.
जरी आफताबने गुन्ह्यांची कोर्टात कबूली दिली असली तरी पोलिसांना कितपत खरं सांगतोय, यावर संशंय घेतला जात आहे. त्यामुळे सुरवातीला त्याची नार्को टेस्ट (Narco test) केली जाणार होती पण पोलिसांनी त्या अगोदर पॉलिग्राफ टेस्ट (Polygraph test) करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे आता आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.
पॉलिग्राफ टेस्ट सत्य जाणून घेण्यासाठी असते. शारीरिक हालचालीतून व्यक्ती खरं बोलतो की खोटं, हे या टेस्टमधून कळतं. पहिल्यांदा पॉलिग्राफ टेस्ट 1921 साली अमेरिकेत करण्यात आली होती.
अशी केली जाते पॉलिग्राफ टेस्ट?
पॉलिग्राफ टेस्ट करण्यापूर्वी व्यक्तीची मेडीकल टेस्ट केली जाते.
पॉलीग्राफ टेस्ट दरम्यान मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छातीवर आणि बोटांना जोडलेले असतात.
व्यक्तीला सुरवातीला सामान्य प्रश्न विचारले जातात. त्यानंतर गुन्ह्यासंदर्भात प्रश्न विचारले जातात.
यादरम्यान व्यक्ती जेव्हा उत्तर देतो तेव्हा मशिनच्या स्क्रीनवर त्याच्या हार्टचे ठोके, ब्लड प्रेशर, नाडी यांचं नोंद होते.
पूर्वी केलेली मेडीकल टेस्ट आणि या टेस्ट दरम्यान नोंदवण्यात आलेलं निरीक्षण यातला फरक जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
या नार्को टेस्टमध्ये आरोपीला काही औषधी दिली जातात. ज्यामुळे व्यक्तीचे ब्रेन सुस्त होते आणि आरोपीचे फार बुद्धीने विचार करण्याची क्षमता कमी होते आणि तो खरं बोलायला लागतो. पण प्रत्येकवेळी आरोपी नार्को टेस्टमध्ये खरं बोलेल, याची शक्यता नसते. कधी कधी ही नार्को टेस्ट फेल सुद्धा होऊ शकते.
नार्को टेस्टमध्ये आरोपीला “ट्रुथ ड्रग” नावाचे औषध किंवा “सोडियम पेंटोथल किंवा सोडियम अमाईटल”चे इंजेक्शन दिले जाते. यामुळे आरोपीचा ब्रेन सुस्त होतो. आरोपीची बौद्धीक क्षमता दूर होते.
तर पॉलिग्राफ टेस्टमध्ये मशीनीद्वारे प्रश्नाचे उत्तर देताना आरोपीचा ब्लड प्रेशर, नाडीचे आणि हार्टचे ठोके यातील बदल नोंदवले जातात. त्यावरून व्यक्ती कितपत खरं बोलतोय, हे ठरवलं जातं.