महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ नोव्हेंबर । सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) आणि तमिळनाडूमधील जलीकट्टू या खेळाशी संबंधित कायद्याला आव्हान देण्यात आलं आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम.जोसेफ यांच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. तामिळनाडू सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हिवाळी सुट्ट्याच्या नंतर जल्लीकट्टू प्रकरणात सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती.
मात्र, न्यायालयाने जानेवारीमध्ये जल्लीकट्टू असल्याने या प्रकरणात तात्काळ सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. तसेच याप्रकरणी वकिलांना अहवाल लवकर सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या प्रकरणावर आज 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.