महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ नोव्हेंबर । श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने मंगळवारी न्यायालयात सांगितले की, त्याने रागाच्या भरात मैत्रिण श्रद्धाची हत्या केल्याची कबूली दिली. मात्र, या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण सुरू झाले आहे. रागाच्या भरात एखादा व्यक्ती शरीराचे 35 तुकडे करेल का, आणि पुढील 18 दिवस ते तुकडे कसे काय सांभाळू शकतो.
यावर दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ सल्लागार तथा मानसोपचारतज्ज्ञ डॉ.संदीप वोहरा यांनी आफताबचे विधान पूर्णपणे खोटे असल्याचा दावा केला आहे. श्रद्धाची हत्या ही रागात केलेली घटना नसून तो पूर्वनियोजित कट असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आफताब कोर्टात काय म्हणाला
श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबने मंगळवारी न्यायालयात सांगितले की, त्याने रागाच्या भरात आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या केली. यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप वोहरा यांच्याशी संवाद साधला असता. तेव्हा त्यांनी हा पूर्वनियोजित कट असल्याचे मत व्यक्त केले आहे.
रागात कृत्य करणारे आत्मसमर्पण करतात
डॉ. संदीप वोहरा म्हणाले की, रागाच्या भरात कोणी गुन्हा केला. तर काही वेळाने त्यालाही आपली चूक कळते. अनेक वेळा एका व्यक्तीने दुसऱ्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे.
आफताबचे कृत्य एखादा मनोरुग्नच करू शकतो
दरम्यान, त्याचवेळी आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर पुढील काही दिवस तो पुरावे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करित होता. यावरून त्याने श्रद्धाच्या हत्येचा कट आधीच रचल्याचे स्पष्ट होते. डॉ.बोहरा म्हणाले की, हत्येनंतर आफताबने ज्या प्रकारचे काम केले ते केवळ मनोरुग्णच करू शकतो. एकादा सामान्य व्यक्ती करू शकत नाही. आफताबला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे दिसून येते.