ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २३ नोव्हेंबर । ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीविषयी पुण्यातून महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. विक्रम गोखले यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्यावर पुणे याठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशीही माहिती मिळाली आहे की त्यांच्यावर गेले १५ दिवस याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या खालावली आहे.

गेल्या १५ दिवसांपासून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. आज असे अपडेट समोर आले असून त्यांची प्रकृती बिघडली आहे आणि त्यांनी डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद देणे थांबवले. त्यांची प्रकृती आता चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांकडून अद्याप याविषयी कोणतेही निवेदन किंवा माहिती समोर आलेली नाही.

अभिनेते विक्रम गोखले यांनी गेल्याच महिन्यात ३० ऑक्टोबर रोजी ८२ वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काहीच दिवसात अभिनेत्याच्या तब्येतीविषयी चिंताजनक माहिती समोर आली आहे. विक्रम यांनी रंगभूमी, टेलिव्हिजन आणि सिनेमा हे सर्वच व्यासपीठ गाजवले आहेत. रंगभूमीवर तर त्यांनी एक मोठा काळ गाजवला आहे. सध्या विक्रम गोखले ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मालिकांविषयी बोलायचे झाल्यास काही वर्षांपूर्वी आलेली त्यांची स्टार प्रवाहची मालिका ‘अग्निहोत्र’ विशेष गाजली होती. या मालिकेत विक्रम यांनी साकारलेले मोरेश्वर अग्निहोत्री हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *