महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – आज राज्यात कोरोनाचे आणखी १०८९ रुग्ण वाढले आहेत. तर ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता १९,०६३ वर पोहोचली आहे. आज राज्यात कोरोनाचे १६९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आज वेगवेगळ्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढले. धारावीत कोरोनामुळं आज ५ जणांचा मृत्यू झाला असून आणखी २५ रूग्ण वाढले आहेत. धारावीत एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या २६ वर पोहोचली आहे. धारावीत एकूण कोरोना रूग्णांची संख्या आता ८०८ झाली आहे. तर यातील २२२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.