महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – औरंगाबाद शहरात कोरोनाचा कहर काही केल्या थांबत नाही अशी स्थिती झाली आहे. दिवसेंदिवस आकडेवारीत वाढच होत आहे. दरम्यान शनिवारी (ता.९) कोरोनाचे नव्याने १७ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी ४७८ वर कोरोना रुग्णांचा आकडा होता. तोच शनिवारी नव्याने १७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ४९५ वर गेला आहे. यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत भर पडली आहे.