महाराष्ट्र २४ – ऑनलाईन -मुंबई – विशेष प्रतिनिधी – ‘राज्यातून कोरोनाचे संकट घालविण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्याने दखल घेतली जाईल. सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू,’’ असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. लॉकडाउनची अंमलबजावणी चांगली केल्याने एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रसार रोखला होता. आता मे अखेरपर्यंत आपणास ही साथ वाढू द्यायची नाही. सर्वांनी सहकार्य केल्यास यात यश येईल असेही ते म्हणाले.
ठाकरे यांनी आज विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोना विषयक लढ्यात आम्ही राज्य सरकारबरोबर आहोत, असे ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून तर इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यातून या चर्चेत सहभागी झाले होते.
कोरोनाच्या साथीतही राज्यभरात रोजगाराची सुवर्णसंधी
मुख्यमंत्री म्हणाले…
– लॉकडाउनमुळे एप्रिल महिन्यात रुग्ण संख्या वाढली नाही
– मे अखेरीपर्यंत सर्वांना काळजी घ्यायची आहे.
– चाचण्यांची संख्याही खूप वाढवली आहे.
– व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज आहे.
– परराज्यातील नागरिकांनाही पुरेशी काळजी
घेऊन आम्ही गावी पाठवत आहोत.
– मदतीसाठी केंद्रीय संस्थांना विनंती केली