Pune Navle Bridge : ‘सावधान… नवले ब्रिज पुढे आहे’ ; पुण्यातील हटके बॅनरची चर्चा

 56 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ नोव्हेंबर । मागील चार दिवसांपासून अपघाताची मालिका सुरु आहे. या अपघातांमुळे सध्या पुण्यात या पुलाची (navle Bridge) चर्चा सुरु आहे. पुणेरी पाट्या राज्यभार प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील नवले पुलावर लावलेलं हटके बॅनरही चर्चेचा विषय ठरलं आहे. हे बॅनर सध्या सोशल मीडियावर व्हायरल देखील झालं आहे.

जनजागृतीसाठी नवले ब्रीजच्या सुरुवातीला “सावधान नवले ब्रीज पुढे आहे” असं मजकुराचे बॅनरवर लागले आहेत. बॅनरवर लागलेले चित्र आणि मजकूर चर्चेचा विषय बनत आहे. अपघातामुळे पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे बॅनर लावण्यात आले आहेत. नवले ब्रिजवर सेल्फी पॉईंटजवळ हे बॅनर लावण्यात आले आहेत.

चर्चा अन् दोषारोपच फार
या पुलावर आतापर्यंत अनेकदा अपघात झाले. त्यात अनेकांचा जीवही गेला. मात्र प्रशासन अजूनही झोपेत असल्याचं चित्र आहे. या पूर्वीही अनेक आश्वासनं देण्यात आली. उपययोजनांसाठी चर्चा केली. प्रशासनाकडून पाहणी अनेकदा झाली. मात्र या सातत्याने होणाऱ्या अपघाताला अजूनही आळा बसत नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून हे बॅनर लावण्यात आलं आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने दिली आहेत. आंदोलनं केली आहेत. मात्र प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. या सगळ्यांमुळे अनेकांचे नाहक जीव गेले आहेत. अनेकांच्या गाड्यांचं नुकसान झालं आहे. मात्र तरीही प्रशासन दुर्लक्ष करताना दिसत आहे. मात्र जबाबदारी म्हणून किमान हे बॅनर पाहून तरी पुणेकर सतर्क होतील आणि प्रशासन काही प्रमाणात उपाययोजना करतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीने व्यक्त केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.