‘शिवसेनेकडून धमकी देतोय…’, संजय राऊतांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भरला दम

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २४ नोव्हेंबर । ‘सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचे, सरकार मिंधे असेल, पण आजही शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावू. रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू. शिवसेनेकडून धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देतोय’, असा थेट इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोम्मई यांना दिला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा सांगितला आहे. त्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचे, सरकार मिंधे असेल, पण आजही शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावू. रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू. 106 हुतात्म दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे, आम्हीही भोगो. शिवसेनेकडून धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देतोय, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

40 आमदारांचा गट आहे. स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडला, आता कुठे गेलं तुमचं स्वाभिमान, कुठे शेण खात आहे. एक कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील 40 गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा मुख्यमंत्री उद्योग पळवून नेतो. षंढा सारखे बसला तुम्ही, अशी तिखट टीकाही राऊत यांनी शिंदेंवर केली.

आमचे सत्ताधारी आज गुडघ्यावर बसले असेल XXX वर करून, तरीही शिवसेना ही स्वाभिमानाने उभी आहे महाराष्ट्रामध्ये. मी सीमा भागात गेलो आहे, आताही परत जाईल. मी XX नाही, शिवसेना XXX ची अवलाद नाही. मी परत सांगतो. मुख्यमंत्र्यांकडे सीमाभागाचा भार होता तर 10 वर्षामध्ये का गेला नाही. तिथे किती मंत्री गेले आतापर्यंत, चंद्रकांत पाटील तिथे जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात. तिकडेच त्यांचं कौतुक करून येतात, हे आमच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमजोर आणि दुबळे सरकार अस्तित्वात आले आहे. आपले मुख्यमंत्री हे देवधर्म, ज्योतिष, तंत्रमंत्रामध्ये अडकून पटले आहे. त्यामुळे कर्नाटकमधून महाराष्ट्रावर हल्ले होत आहे. कुणी आपले उद्योग पळवत आहे, कुणी आमच्या जमिनी पळवत आहे. त्यावर ठाम भूमिका घेतली आहे. एकही गाव जाणार नाही असं बोलून चालत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातली आहे. आपल्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अशी हिंमत केली नाही. ते भाजपचे मुख्यमंत्री आहे, तुम्हीही भाजपच्या नेतृत्वामध्ये सरकारमध्ये आहे. आतून काय संगनमत चालू आहे का, गुजरातने महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने महाराष्ट्राची गाव पळवायची असं ठरलं आहे का? महाराष्ट्र खत्म करण्याचा डाव आहे का? दुसरीकडे भाजपचे लोक महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यासाठी यांच्यावर हल्ले करत आहे. आमचं मनोधैर्य खच्चीकरण करायचं असं षडयंत्र रचलं जातंय का, अशी भीती आता वाटत आहे, अशी शंकाही राऊत यांनी उपस्थितीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *