महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ नोव्हेंबर । महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर बाबा रामदेव हे अडचणीत सापडले आहेत, दरम्यान त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांच्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांना नोटीस पाठवणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
रामदेव बाबा यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर या विधानाचा खुलासा द्यावा, यासाठी महिला आयोग नोटीस बजावणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. रामदेव बाबा यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.
राजकीय क्षेत्रातून देखील बाबा रामदेव यांच्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी, “हे अतिशय धक्कदायक विधान आहे. हा स्वतःला बाबा समजोय, भगवी वस्त्रे परिधान करतो. करोडोनं सरकारी जागा बळकावतो. उद्योगधंदे सुरु करतो. सिनेमातील हिरोईन्स याच्याकडं योगासनं शिकतात आणि हा बाबा अशा प्रकारे महिलांबाबत बोलतो. तिथं उपस्थित महिलांनी त्याला तिथंच झोडपून काढायला हवं होतं. एका भगवे वस्त्र परिधान केलेल्या बाबाला हे शोभत नाही. हा सन्यासी आहे तर बायकांकडे बघतो कशाला?” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं घडलं काय?
रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. यावरून आता टीका होत आहे.