महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ नोव्हेंबर । संविधान दिनानिमित्त । भारतीय नागरिक म्हणुन जीवन जगण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेले अधिकार, कर्तव्य व जबाबदाऱ्या सर्व नागरिकांना समजण्यासाठी….संपूर्ण संविधानाचा एक सारांश तयार करून इयत्ता 10 वि च्या वर्गाला बंधनकारक विषय म्हणुन अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा. जेणेकरून सर्वच जाती- धर्माच्या घटकातील ( सवर्ण, दलित, भटके , आदिवासी, मागासवर्गीय) विद्यार्थ्यांना संविधान म्हणजे काय आहे ह्याचे महत्व कळेल परिणामी भविष्यात समाजात समता प्रस्थापित होईल जी देशाची एकता, समता व सार्वभौमत्वता सुव्यवस्थित/अबाधित राहण्यासाठी तसेच समाजा-समाजात असणारी….सामाजिक, राजकीय व आर्थिक विषमता नष्ट होण्यासाठी उपयुक्त ठरेल….कारण 10 वि तील विद्यार्थ्यांचे वय हे बौद्धिक समज येण्याचे वय असते….ह्या कालावधीत बुद्धीची आकलनशशक्ती व स्मरणशक्ती दोन्ही तेजीत असतात…ह्या वर्गात शिकलेले व अनुभवलेले उतारवयात ही आठवते….आणि शिकवणारे शिक्षक असतात जेथे भेदभाव नसतोच… त्यामूळे संविधान घरा घरात व मनामनांत पोहचण्यासाठी ” भारतीय संविधान ” हा विषय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात असावा.