महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ नोव्हेंबर । संपूर्ण जगभरात वाढलेल्या महागाईतून दिलासा मिळणार आणि हा दिलासा टिकाऊ असेल. जागतिक बँकेच्या एका अहवालानुसार, काही आठवड्यांनंतर सुरू होणाऱ्या २०२३ मध्ये कच्चे तेल, गॅस, अन्नधान्य, खाद्यतेल, कॉटन आणि धातू यासारख्या सर्वच वस्तूंच्या किमती १५ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहेत. यानंतर २०२४ मध्येही यांच्या किमतीत १२% पर्यंत घसरण येण्याची शक्यता आहे. या वर्षी ऊर्जा वस्तू म्हणजेच कच्चे तेल आणि नैसर्गिक गॅसमुळे सर्वात जास्त महागाई वाढली. पुढच्या वर्षी याच्या किमती सर्वात जास्त कमी होणार आहेत. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडियांच्या मते, पुढच्या वर्षी कच्च्या तेलाच्या इंटरनॅशनल बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत १७% कमी होऊन ७५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत येऊ शकते.
या कारणामुळे मिळेल महागातून दिलासा
खाद्यतेल| युक्रेनकडे सनफ्लाॅवर तेलाचा मोठा स्टॉक. देशात मोहरीची शेती वाढेल. पामतेल निर्यातक मलेशिया आणि इंडोनेशियात कामगारांची संख्या पुरेशी.
अन्नधान्य | देशात अन्नधान्याचे उत्पादन दरवर्षी वाढत आहे आणि हाच ट्रेंड सुरू राहण्याचा अंदाज आहे. उदा. रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन कापूस| कापसाचे उत्पादन ८.५% वाढण्याची शक्यता. अमेरिकेत उत्पादन चांगले राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या भावावर दबाव येऊ शकतो.
तेल-वायू: मंदीसारख्या परिस्थितीमुळे कच्चे तेल आणि वायूच्या मागणीत कमी येईल. चीनमध्ये कोरोनाचे निर्बंध वाढल्याने लॉकडाऊन लागले आहे.