देशातील रोजगाराला धक्का बसणार? ; Amazon भारतातली ही सेवा बंद करणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ नोव्हेंबर । ॲमेझॉन भारतात आपली अन्न वितरण सेवा (फूड डिलिव्हरी) बंद करणार आहे. ॲमेझॉनने भारतातील आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना आपल्या निर्णयाची माहिती दिली आणि सांगितले की त्यांनी आपली फूड डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने मे २०२० मध्ये बेंगळुरूमध्ये ही सुरू केली असून आता ही सेवा २९ डिसेंबर रोजी बंद होणार आहे. म्हणजेच या तारखेनंतर तुम्हाला ॲमेझॉन फूडद्वारे ऑर्डर मिळणार नाही. कंपनीने रेस्टॉरंटला माहिती देत सांगितले की ते सर्व पेमेंट आणि इतर आवश्यक ऑर्डर पूर्ण करेल.

कंपनीने जागतिक स्तरावर हजारो कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखली असतानाही, ई-कॉमर्स प्रमुख कंपनीने देशातील आपली नवीन edtech शाखा बंद केल्याच्या एका दिवसानंतर नवीन अपडेट समोर आले आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या वरील निर्णयामुळे भारतातील रोजगाराला धक्का बसण्याची शक्यता आहे.

कंपनीने पुढे सांगितले की ते २९ डिसेंबरपासून सेवा बंद करणार आहेत. रेस्टॉरंट ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व ॲमेझॉन टूल्स आणि रिपोर्ट्सचा वापर करू शकतील. ॲमेझॉनने आपल्या रेस्टॉरंट भागीदारांना सांगितले, “आमच्या वार्षिक संचालन नियोजन पुनरावलोकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून, आम्ही आमचा पायलट फूड डिलिव्हरी व्यवसाय, ॲमेझॉन फूड, बेंगळुरूमध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आमचे विद्यमान ग्राहक आणि भागीदार यांची काळजी घेण्यासाठी आम्ही हे कार्यक्रम टप्प्याटप्प्याने बंद करत आहोत.”

दरम्यान, गेल्या आठ वर्षांत भारतात ६.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केल्यानंतरही ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनला देशात फारसा फायदा झाला नाही, असे ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनच्या अलीकडील अहवालात म्हटले आहे. याशिवाय, स्मार्टफोन आणि कपड्यांसारख्या वेगाने वाढणार्‍या श्रेणींमध्ये कंपनीला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत कंपनीने फूड डिलिव्हरी सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याशिवाय कंपनीने रेस्टॉरंटना सर्व देयके आणि इतर कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. रेस्टॉरंटना ३१ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व ॲमेझॉन टूल्स आणि रिपोर्ट्समध्ये प्रवेश असेल. कोणतीही अडचण आल्यास ३१ मार्चपर्यंत त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.

त्याची सेवा बंद करण्याबाबत, ॲमेझॉन म्हणाले, “आमच्या वार्षिक ऑपरेटिंग पुनरावलोकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून, आम्ही ॲमेझॉन फूड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, बेंगळुरूमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून आमच्याद्वारे फूड डिलिव्हरी व्यवसाय सुरू करण्यात आला.” याशिवाय कंपनीने म्हटले की, “आम्ही असे निर्णय घाईघाईने घेत नाही. आमच्या विद्यमान ग्राहक आणि भागीदारांची काळजी घेण्यासाठी आम्ही टप्प्याटप्प्याने कार्यक्रम बंद करत आहोत. या काळात आम्ही आमच्या प्रभावित कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत राहू.”

तसेच कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी वचनबद्ध आहे आणि किराणा, स्मार्टफोन आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन आणि सौंदर्य तसेच ॲमेझॉन व्यवसाय यांसारख्या B2B विभागांमध्ये गुंतवणूक करणे सुरू ठेवेल, असे ॲमेझॉनने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *