बुलढाणा जिल्ह्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड : राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मका खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याला 25 हजार मेट्रीक टन मका खरेदी करता येणार आहे. सदर मका खरेदी केंद्र जिल्ह्यात तात्काळ सुरू व्हावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून बुलढाणा जिल्ह्यात लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू होणार आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणावर बागायती मक्याची लागवड केली व मक्याचं भरघोस उत्पादन घेतलं. परंतु कोरोना मुळे बाजारात मक्याला एक हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत असल्याने मका उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे शासनाने शासकीय आधारभूत भावानुसार मका खरेदी करावी, अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून होत होती.

याचीच दखल घेत केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात ह्या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. सदर खरेदी केंद्र जिल्ह्यात तात्काळ सुरू करावे यासाठी पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे तसेच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. म्हसे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यास संबधित यंत्रणेला आदेशीत केले असून जिल्ह्यामध्ये लवकरच शासकीय मका खरेदी केंद्र सुरू होणार असून मका उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे, असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *