![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । केंद्राने सहा वर्षापूर्वी केलेल्या नोटबंदीमुळे बाद ठरलेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटांबाबत सर्वोच्च न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे जुन्या नोटांबाबत ज्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यांना त्यांच्या जुन्या नोटा बदलून मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नोटाबंदीच्या काळात जेव्हा नोटा बदलून दिल्या जात होत्या तेव्हा आम्ही परदेशात होतो. त्यामुळे आपल्याला जुन्या नोटा बदलता आल्या नाहीत असे सांगत सर्वोच्च न्यायालयात काही याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी घेताना न्यायालयाने आपल्या नोटा जपून ठेवा असे संबंधितांना सांगतानाच रिझर्व्ह बँकेने नोटा बदलून देण्याच्या याचिकाकर्त्यांच्या मागणीवर विचार करावा असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्यावतीने महाधिवक्ता आर. व्यंकटरमणी यांनी नोटा बदलून देण्याची मुदत वाढवून दिली जाऊ शकत नाही. पण संबंधितांनी नियम व अटींची पूर्तता केल्यास आरबीआय विचार करेल असे न्यायालयात म्हटले आहे. तसेच 700 लोकांचे नोटा बदलण्याबाबत आरबीआयकडे अर्ज आले असल्याचेही त्यांनी सांगितले.