Shraddha Murder Case: श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नाही, पॉलीग्राफ टेस्टनंतर नराधमाची ची कबुली

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ३० नोव्हेंबर । वसईतील श्रद्धा वालकर या तरुणीची तिचा प्रियकर आफताब पूनावालाने दिल्लीत हत्या केली. हत्येनंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतील मेहरौली जंगलात फेकून दिले होते. हत्येच्या जवळपास सहा महिन्यांनी या प्रकरणाचा उलगडा झाला. त्यानंतर दिल्ली पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलंय.

मंगळवारी करण्यात आलेल्या पॉलीग्राफ टेस्टमध्ये आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. पॉलीग्राफ टेस्ट करणाऱ्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने श्रद्धाला मारल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं म्हटलंय. आता 1 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट होणार आहे.

मंगळवारी आफताबची पाचवी म्हणजेच शेवटची पॉलीग्राफ चाचणी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कार्यालयात झाली. एफएसएलच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आफताबची पॉलीग्राफ टेस्ट पूर्ण झाली आहे आणि त्याचा रिपोर्ट लवकरच न्यायालयात सादर केला जाईल. दुसरीकडे, दिल्ली पोलिसांना 1 डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट करण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.

मंगळवारी आफताबला कडेकोट पोलीस बंदोबस्तात पाचव्यांदा एफएसएल कार्यालयात आणण्यात आलं. कारण सोमवारी काही तलवारधारी व्यक्तींनी त्याला घेऊन जाणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या व्हॅनवर हल्ला केला होता. हे लोक हिंदू सेनेचे सदस्य होते. या हल्ल्यानंतर एफएसएल कार्यालयाबाहेर सीमा सुरक्षा दलाला तैनात करण्यात आलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *