IPL 2023: आयपीएलच्या नियमात मोठा बदल; आता प्रत्येक संघात असणार इतके खेळाडू

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ डिसेंबर। टी-२० लीगमधील जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत अशी आयपीएल स्पर्धा पुन्हा एकदा धमाका करण्यास सज्ज झाली आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये आयपीएलचा नवा हंगाम सुरु होणार आहे. पण त्यासाठीची तयारी आतापासून सुरू झाली आहे. आयपीएल २०२३साठीचा मिनी लिलाव २३ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.

आयपीएलच्या गव्हर्निंग काउंसिलमध्ये मोठ्या चर्चेनंतर एका नव्या नियमाचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल २०२३ मध्ये आता इंपेक्ट प्लेयर नियमाला मंजूरी देण्यात आली आहे. इनसाइड स्पोर्टने दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलमध्ये आता नाणेफेकीच्या वेळी दोन्ही कर्णधार ११ ऐवजी १५ खेळाडूंची नावे सांगतील. त्यापैकी ११ खेळाडू हे प्लेइंग ११ मध्ये असतील तर अन्य चार खेळाडू हे सबटीट्यूट असतील. या चार पैकी कोणताही एक खेलाडू मॅच सुरू असताना प्लेइंग ११ मधील कोणत्याही खेळाडूची जागा घेऊ शकेल.

संबंधित खेळाडूला गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करता येईल. या नियमानुसार अशा खेळाडू संघाच्या डावाच्या १४व्या ओव्हरपर्यंतच संघाकडून खेळू शकेल. त्यानंतर मात्र असा सबटीट्यूट घेता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *