109 total views
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ डिसेंबर। लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरच्या हत्येचाआरोप असलेल्या आफताब पूनावालाच्या आयुष्याशी संबंधित आणखी एक रहस्य तो तुरुंगात गेल्यानंतर उघड झालं आहे. आफताबच्या आयुष्याशी संबंधित हे रहस्य जाणून तिहार तुरुंगातील अधिकारीही चक्रावून गेले. आफताब पूनावाल हा बुद्धिबळ खेळाचा अनुभवी खेळाडू आहे. तो असा खेळाडू आहे जो स्वतःच्या चाली आणि स्वतःच्या विरुद्धच्या चालीही स्वतःच खेळतो आणि स्वतःच्याच चालींना उत्तर देतो.
आफताब खूप हुशार असल्याचा दिल्ली पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. त्याची प्रत्येक चाल सुनियोजित कटाचा भाग असल्याचे दिसते. जणू तो एकटाच बुद्धिबळाच्या पटावर दोन्ही टोकांना खेळत आहे. तपासादरम्यान दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकार्याने तर असंही सांगितलं होतं की, पोलिसांना वाटतं की तपास अधिकारी आम्ही नसून खुनी आफताबच आहे, ज्याच्या इशार्यावर दिल्ली पोलीस नाचत आहे.
एका पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आफताब एक रणनीती म्हणून त्याच्या बनावट कथेत पोलिसांना गुंतवत आहे. त्यामुळेच प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांनी या नराधमाच्या मनाचा पाढा वाचण्यासाठी मानसशास्त्रज्ञाची मदत घेतली आणि आता त्याची नार्को टेस्ट करण्यास भाग पाडले गेले. म्हणजेच, त्याच्या कोणत्याही विश्वास ठेवणे कठीण आहे. आफताबच्या कोठडीत आणखी दोन कैद्यांना ठेवण्यात आले असून त्यांना २४ तास आफताबवर पाळत ठेवण्यास सांगण्यात आले आहे. एवढंच नाही तर तुरुंगात आफताबला असलेला धोका लक्षात घेता जेल अधिकारी त्याच्या सेलभोवती विशेष लक्ष ठेवत आहेत.
तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आफताब ना कोणाशी जास्त बोलतो ना तो तुरुंगात कोणाशीही मिसळतो. तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आफताब वेळेवर जेवण करतो आणि वेळेवर झोपतो. जणू त्याला त्याच्या कृतीचा पश्चातापच नाही. श्रध्दाचा खून हा सुद्धा बुद्धिबळाच्या रणनीतीप्रमाणेच मोठा कटाचा भाग होता, असं त्याच्या कृतीतून दिसतं. दिल्ली पोलिसांनी 12 नोव्हेंबर रोजी श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली आफताबला अटक केली होती.