ख्रिसमस आणि न्यू इअरसाठी ट्रिप प्लान करताहेत; रेल्वेकडून विशेष ४२ गाड्यांचे आयोजन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।५ डिसेंबर। हिवाळा आणि ख्रिसमसमध्ये प्रवाशांची संख्या जास्त असण्याची शक्यता गृहित धरून रेल्वेकडून चार जानेवारी २०२३ पर्यंत ४२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे : पुणे-अजनी साप्ताहिक विशेष दहा गाड्या सोडण्यात येणार आहे. सहा डिसेंबर २०२२पासून ते तीन जानेवारी २०२३पर्यंत पुण्यातून दर मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता ही गाडी सुटेल; तर सात डिसेंबर २०२२ ते चार जानेवारी २०२३पर्यंत दर बुधवारी अजनी येथून सायंकाळी ७.५० वाजता गाडी सुटेल.

पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष दहा गाड्या सोडण्यात येणार आहे. सात डिसेंबर २०२२ ते चार जानेवारी २०२३ दरम्यान दर बुधवारी नागपूर येथून दुपारी एक वाजून ३० मिनिटांनी ही गाडी सुटेल. तर, आठ डिसेंबर २०२२ ते पाच जानेवारी २०२३ दरम्यान पुणे येथून दर गुरुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी गाडी सुटेल. मुंबई-नागपूर साप्ताहिक विशेष दहा गाड्या सोडण्यात येणार आहे. ही गाडी सहा डिसेंबर २०२२ ते तीन जानेवारी २०२३ दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी रात्री आठ वाजून १५ मिनिटांनी सुटेल, तर नऊ डिसेंबर २०२२ ते सात जानेवारी २०२३ दरम्यान नागपूर येथून दर शुक्रवारी दुपारी एक वाडून ३० मिनिटांनी सुटेल.

मुंबई-मंगळूरू साप्ताहिक विशेष दहा गाड्या नऊ डिसेंबर २०२२ ते सात जानेवारी २०२३ दरम्यान सोडण्यात येणार आहेत. मुंबई-मडगाव साप्ताहिक विशेष दोन गाड्या सोडण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *