Milk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती वाढ झाली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ डिसेंबर। वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात (milk price hike) वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे आणि पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी असून गोकुळच्या दुध दरात तीन रुपयांनी वाढ झाली आहे. (milk price increase in mumbai, pune and thane)

यामध्ये गाईच्या दुधाचा दर 51 रुपयांवरुन 54 रुपये लीटरने वाढ झाली आहे. फक्त मुंबई, मुंबई उपनगर, पुणे आणि ठाणे याच शहरांत गोकुळनं दुध दरवाढ केली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात दूध विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

तसेच पुणे जिल्ह्यात गाईच्या दुधाचे (cow milk price increase) मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. तर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात म्हशीच्या दुधाचे मोठे उत्पादन होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध पावडर, बटरच्या दरात वाढ झाली. लम्पी रोग आणि अतिवृष्टीमुळे दूध उत्पादन घटले. परराज्यातील दूध व्यावसायिक त्यांच्या राज्यात दूध खरेदीला कमी दर देतात. मात्र, महाराष्ट्रात जादा दराने खरेदी केल्याने त्याचा व्यवसायावर परिणाम होतो.

कोरोना काळातील लॉकडाऊननंतर दूध दरात वाढ झाली असली तरी जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या किंमतीही भरमसाठ वाढल्या आहेत. त्यामुळे गोकुळ दूध संघाने केलेली दरवाढ दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे. महागाईच्या काळात ही दरवाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना हातभारही लागणार आहे.

– गोकुळच्या दुध दरात तीन रुपयांची वाढ
– मुंबई, पुणे, ठाण्यात सर्वसामान्यांना फटका
– गाईच्या दुधाचा दर 51 रुपयांवरुन 54 रुपये लीटर
– मुंबई, पुणे, ठाणे वगळता इतरत्र दरवाढ नाही
– कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गाय दूध विक्री दरात कोणतीही वाढ नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *