श्रद्धा वालकर हत्याकांडात नवा आणि महत्त्वाचा अँगल समोर ; अद्याप हि कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ डिसेंबर । श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी तिचा लिव्ह इन पार्टनर आफताब पुनावाला याला पोलिसांनी अटक करून जवळपास 23 दिवस उलटले आहेत. मात्र, तरीही या प्रकरणात अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. अशातच आता श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी आफताबने वापरलेल्या दोन हातोड्यांबद्दलची माहिती पोलीस शोधत आहेत.

आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. यानंतर हे तुकडे त्याने दिल्लीतील मेहरोली परिसरातील जंगलात फेकले होते. दरम्यान श्रद्धाच्या डोक्याचे तुकडे करण्यासाठी आफताबने विकत घेतलेल्या दोन हातोड्यांचा वापर केला आणि नंतर करवतीने तुकडे केले, असा संशय पोलिसांना आहे. याच अँगलने पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आफताब आपले जबाब सातत्याने बदलत आहे. त्याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणीही केली गेली. मात्र, यातही आफताबने काही विशेष माहिती दिली नसल्याचं समोर येत आहे. अशात आता पोलीस आफताबने विकत घेतलेल्या दोन हातोड्यांचा वापर नेमका कशासाठी केला, याचा तपास करत आहेत. पोलिसांना अजूनही श्रद्धाचं शीर सापडेलंल नाही. आफताबने हातोड्याने तिचं डोकं फोडलं असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

दरम्यान या प्रकरणात आफताब आणि श्रद्धाच्या सोशल मीडियाचाही कसून तपास सुरू आहे. आफताब इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियाच्या आपल्या अकाऊंटवर बड्या रेस्टॉरंट आणि दुकानांची जाहिरात करायचा आणि यासाठी तो पैसेही आकारायचा, असं समोर आलं आहे. आफताबची इंटरनेट सर्च हिस्ट्री तपासण्यात आली असता यातून एक मोठी आणि महत्त्वाची बाब समोर आली आहे. श्रद्धाच्या हत्येनंतर जून महिन्यात लढलेली जगातील सर्वात महागडी केस आफताबने अनेकवेळा पाहिली आणि वाचली होती. या प्रकरणातून कायद्याच्या सर्व युक्त्या त्याने समजावून घेतल्या होत्या, असं सांगितलं जात आहे. आतापर्यंत आफताबने या प्रकरणात पोलिसांना चकवा दिला आहे. अद्याप पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *