म्हाडाची २ हजार घरांसाठी निघणार जाहिरात, लवकरच सोडत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ९ डिसेंबर । उपनगराममध्ये 2 हजार 46 घरांसाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. येत्या दहा दिवसांमध्ये यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार आणि वेंगुर्ल्यात घरांसाठी ही सोडत असणार आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 1, अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 23 तर मध्यम उत्पन्न गटासाठी 18 आणि उच्च उत्पन्न गटासाठी चार घरे यामध्ये असणार आहेत.

म्हाडाच्या मुंबई आणि कोकण मंडळाच्या सोडतीच्या निकषातील बदल आणि नव्या संगणकीय प्रणालीमुळे ही सोडत पुढे ढकलली होती. आता नवी प्रणाली तयार झालीय. सध्या त्याच्या चाचण्यासुद्धा यशस्वी झाल्या आहेत. त्यानंतरच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून घरांची अंतिम आकडेवारी निश्चित केलीय.

कोकण, पुणे, औरंगाबाद मंडळातील घरांसाठी येत्या दहा दिवसात जाहिरात प्रसिद्ध होईल. कोकण मंडळात 2 हजार 46, औरंगाबादमध्ये 800 तर पुण्यात 4 हजार 678 घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाइनच असणार आहे. यासाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. सोडतीआधीच पात्रता ठरणार आहे. त्यानंतर पात्र ठऱलेले अर्जदारच सोडतीत सहभागी होतील.

म्हाडाच्या सोडतीत आरक्षित घरांसाठी पत्रकार, कलाकार, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांसह इतर गटांना अर्ज करता येतो. त्यासाठी नव्या बदलानुसार आता आवश्यक ती प्रमाणपत्रे सोडतीआधीच द्यावी लागणार आहेत. या प्रमाणपत्रांची छाननी सोडतीआधी होईल. ऑनलाइन छाननीपूर्वी प्रमाणपत्राचा नमुना प्रसिद्ध केला जाईल. त्यानुसारच प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *