महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० डिसेंबर । पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे चिंचवड येथे मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवासाठी आले असताना शनिवारी त्यांच्यावर अज्ञातांनी शाई फेकली. सायंकाळी ६ च्या दरम्यान हा प्रकार घडला. त्यामुळे शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. चोख पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडली आहे.
पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. शाई फेकणारी व्यक्ती ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद’चा नारा देत होती. या व्यक्तीचे नाव अद्याप समजलेले नाही.