हिंजवडी पोलिसांची जबरदस्त कारवाई एकाचवेळी 16 गुन्हयांचा तपास लावला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० डिसेंबर । चेन चोराचा तपास लावत असताना हिंजवडी पोलिसांनी वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या 16 गुन्हयांचा तपास लावला आणि चोरीस गेलेल्या एकूण 14 मंगळसूत्र आणि 2 दुचाकी हस्तगत करून मोठी कामगिरी केली आहे. आकाश वजीर राठोड, बिश्रांत नानावत, मंगल नानावत आणि अमर राठोड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 23/11/2022 रोजी हिंजवडी फेज 3 येथील हैद्राबाद बिर्याणी हाउस समोरून पायी जात असलेल्या संगीता मधुकर धुमाळ यांच्या गळयातील मंगळसूत्र मोटारसायकलवरून येत असलेल्या दोन इसमांनी चोरून नेल्याने त्यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार नोंदविली. या गुन्हयाचा तपास करीत असताना खात्रीदार बातमीदाराकडून माहितीच्या आधारे हिंजवडी पोलिसांनी मेगापोलीस सर्कल हिंजवडी येथून सदर चेनचोर अकाश वजीर राठोड यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यास पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने फिर्यादीचे मंगळसूत्र सोमपाल नारायण सिंह यास विकल्याचे सांगितले. सोमपाल यास ताब्यात घेतल्यानंतर त्याने ते मंगळसूत्र अहमदाबाद गुजरात येथे विकल्याचे सांगितले पोलिसांनी तेथून ते हस्तगत केले. त्यानंतर आकाश वजीर राठोड याची कसून तपास केले असता त्याने आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी मिळून एकूण 14 मंगळसूत्र आणि 2 दुचाकी चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याच्या तीन साथीदारांसह एकूण 16 चोरीच्या गुन्हयातील 14 मंगळसूत्र आणि 2 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. सदर गुन्हयांची आणि हस्तगत केलेल्या मालाची माहिती हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त परि. 2 डॉ. काकासाहेब डोळे, सहा. पोलीस आयुक्त श्रीकांत देसले, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो. निरीक्षक हिंजवडी डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, पोलीस निरीक्षक गुन्हे सोन्याबापु देशमुख, सागर काटे, राम गोमारे, रमेश पवार, बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, केैलास केंगले, विक्रम कुदळे, योगेश शिंदे, बापुसाहेब धुमाळ, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडित, आणि सोनाली ढोणे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *