महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – :देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय राज्य पातळीवर घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. दरम्यान कोरोना संकटातून वाचण्यासाठी राज्य पातळीवर अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणे ही देखील मोठी समस्या कोरोना काळात जाणवत आहे. त्याममुळे महाराष्ट्र सहित २८ राज्यांनी यासंदर्भात कठोर निर्णय घेतला आहे.
सार्वजनिक स्थळांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन आणि थुंकण्यासंदर्भातील निर्णय अधिक कठोर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, आसाम सहित २८ राज्यांनी सार्वजनिक स्थळावर तंबाखूजन्य पदार्थ विक्री, सेवन आणि थुंकण्यावर बंदी आणली आहे.
याचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. १ एप्रिलपासूनच हा निर्णय लागू करण्यात आलाय.