महाराष्ट्र 24 ! पिंपरी । विशेष प्रतिनिधी ।
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी पायाभूत सुविधांचा विकास, वाहतूक व्यवस्थापन आणि पार्किंग व्यवस्थापन यासह काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष वेधले. आयुक्तांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.ने याचे आयोजन केले होते.
यावेळी शिवराज शिंदे या नागरिकाच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की भक्ती शक्ती ते मुकाई चौक हा अपूर्ण बीआरटीएस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम) लिंक मे २०२३ च्या अखेरीस पूर्ण होईल. त्याचप्रमाणे त्यांनी रहिवाशांना कमी अंतरासाठी अधिक सार्वजनिक वाहतूक आणि सायकलींचा वापर करण्याचे आवाहन केले.
आयुक्तांच्या म्हणण्यानुसार पुलाखाली लोकांसाठी अधिक पार्किंगची जागा असेल. भोसरी, सखुबाई गार्डन, वायसीएमओयू कॅम्पस, पिंपरी मार्केट, पिंपरी क्रोमा स्टोअर आणि चिंचवड स्टेशन या भागात सरकार अधिक मल्टीलेव्हल पार्किंग उपलब्ध करून देणार आहे. आयुक्तांनी लोकांना पादचारी झोन अधिक वापरण्यास सांगितले. हे व्यवस्थापन विविध कार्यक्रम, धोरणे आणि धोरणे यांचा संदर्भ देते ज्यामुळे लोकांकडून सरकारी संसाधनांचा अधिक कार्यक्षम वापर होतो.
फेसबुकवर लाईव्हवरच जाहीर निषेध
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी लाईव्ह सेशनमध्ये प्रश्न विचारला की, मधुकर पवळे उड्डाणपूल खाली पार्किंग सुविधा बंद करून त्या ठिकाणी हातगाडी धारक व टपरीधारक यांनी अतिक्रमण केले आहे यावर महापालिकेच्या काय उपाययोजना असतील तसेच ट्रॅव्हल्स बस रोज रात्री निगडी बस स्टॉप या ठिकाणी उभ्या करून अवैध प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे मधुकर पवळे बसस्टॉप परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. यावर महापालिकेची काय उपोययोजना असेल? या प्रश्नासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांचा काळभोर यांनी यावेळी फेसबुकवर लाईव्हवरच जाहीर निषेध केला.
सामान्य नागरिकांकडून खेद व्यक्त
मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली पार्किंग सुविधा बंद असल्याने नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पार्किंग सुविधा पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने सुरू ठेवली होती त्यावेळी टू व्हीलरसाठी पार्किंग शुल्क फक्त 10 रुपये भाडे आकारले जात होते. खाजगी पार्किंगमध्ये 20 रुपये आकारले जात आहेत.
पे अँड पार्किंग सुविधा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने बंद केल्यामुळे नागरिकांना वाहने पार्किंग समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने ताबडतोब दखल घ्यावी. निगडी बस स्टॉप या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर कामानिमित्त प्रवास करत असतात. कामानिमित्ताने प्रवाशी 15 ते 20 हजार नागरिक या ठिकाणी बसने पुणे शहर, मावळ, चाकण, पुरंदर, मुळशी किंवा इतर ठिकाणी ये-जा करत असतात. निगडी बस स्टॉपहून दररोज सकाळी साडेचार ते रात्री साडे बारा वाजेपर्यंत दोनशे बस सुरू आहेत. नागरिकांना मोठ्या प्रमाणावर पार्किंग सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे टपरीधारकांनी अतिक्रमण करून मधुकर पवळे उड्डाणपूल पार्किंग बंद पाडली आहे. गेल्या 4 महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे? पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनी फक्त सोशल मीडियावर नागरिकांना पार्किंग व वाहतूक व्यवस्था संदर्भात अवाहन केले आहे. मात्र याविषयी स्पष्ट भूमिका जाहीर न केल्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये खेद व्यक्त केला जात आहे.
प्रतिक्रिया
आयुक्त शेखर सिंह यांनी शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंग संदर्भात फेसबुक लाईव्हवेळी मधुकर पवळे उड्डाणपूलाखाली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने पार्किंग सुविधा ताबडतोब नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी. म्हणून मागणी करण्यात आली होती. त्यासंदर्भात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांनी हाताची घडी, तोंडावर बोट ही भूमिका घेतली. लाईव्ह संवाद साधताना उत्तर दिले नाही त्यामुळे नागरिकांना पार्किंग सुविधा निगडी बस स्टॉप या ठिकाणी लवकरात लवकर उपलब्ध व्हावी या हेतूने आयुक्त शेखर सिंह यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.