महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २५ डिसेंबर । दिशा सॅलियान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय.. दिशा सालीयन प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, अशी माहिती सीबीआयने दिलीय.. सीबीआयकडे हे प्रकरण कधीही सोपवण्यात आलेलं नव्हतं.. त्यामुळे सीबीआयने कुठलाही तपास केला नाही. दिशा सालीयन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा नावाने फिरणाऱ्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, असे सीबीआयने म्हटलंय… सीबीआयकडकून याबाबत अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आलंय..