महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ डिसेंबर । दिल्लीत काल (27 डिसेंबर) किमान तापमान 5 अंशांवर पोहोचलं आहे. येत्या आठवडाभरातही थंडीची स्थिती अशीच राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. देशाच्या राजधानीत सध्या कडाक्याची थंडी पडलीये. थंडीच्या लाटेमुळे सर्वांना घरातच थांबावं लागतंय.दिल्लीत धर्मशाला, नैनिताल आणि डेहराडूनपेक्षाही तापमानाचा पारा घसरला आहे. दिल्लीत काल (27 डिसेंबर) किमान तापमान 5 अंशांवर पोहोचलं आहे. येत्या आठवडाभरातही थंडीची स्थिती अशीच राहणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे.
डेहराडूनमध्ये 7 अंश सेल्सिअस, धर्मशालामध्ये 6.2 अंश सेल्सिअस आणि नैनितालमध्ये 7.2 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलंय.हवामान विभागाकडून दिवसाच्या तापमानात तीव्र घसरण होण्याचं कारण मैदानी प्रदेशातून वाहणारे थंड वायव्य वारे आणि धुक्याच्या वातावरणामुळे कमी सूर्यप्रकाश पडत असल्याचं दिलं आहे.पंजाब आणि हरियाणातील अनेक भाग धुक्यानं व्यापले असून मंगळवारीही राजधानीत कडाक्याची थंडी कायम होती.मैदानी भागांत, किमान तापमान चार अंश सेल्सिअसनं कमी झाल्यास, किमान तापमान 10 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असल्यास आणि सामान्यपेक्षा 4.5 अंश कमी असल्यास IMD थंडीची लाट असल्याचं जाहीर करतं. जेव्हा किमान तापमान दोन अंश सेल्सिअसनं घसरतं किंवा सामान्य तापमान 6.4 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होतं, तेव्हा ‘तीव्र’ थंडीची लाट असल्याचं हवामान विभागाकडून सांगितलं जातं.