Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; चारचाकीचा भीषण अपघात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ डिसेंबर । नागपूरच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या कारचे टायर फुटले, त्यामुळे कर चार कोलांट्या घेत विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन आदळली ही घटना ताजी असतानाच समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. मुंबई वरून नागपूरच्या दिशेने जात असताना वाशिमच्या (Washim) कारंजा नजीक समृद्धी महामार्गावर चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघात एवढा भीषण होता की मृतक मुलगी ही कारच्या बाहेर उडून समृद्धी हायवे रोडच्या बाजूला खाली शंभर फूट अंतरावर जाऊन पडली होती. या अपघातातील सर्वजण नागपूर येथील असल्याची माहिती देण्यात येत आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. (Tajya News)

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. या महामार्गाचं लोकार्पण झाल्यापासूनच या महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे हा समृद्धी महामार्ग हा अपघातांचा महामार्ग झाला आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

समृद्धी महामार्गाची वैशिष्टये –

• लांबी ७०१ किमी • एकूण जमीन : ८३११ हेक्टर • रुंदी : १२० मीटर • इंटरवेज : २४ • अंडरपासेस : ७०० • उड्डाणपूल : ६५ • लहान पूल : २९४ • वे साईड अमॅनेटीझ : ३२ • रेल्वे ओव्हरब्रीज : ८ • द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड) • द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष • कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२ • प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये • एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० • वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये • कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६ • द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत • ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *