फाटलेल्या नोटा कशा मिळतात बदलून ; काय सांगतो RBIचा नियम; जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ डिसेंबर । आपल्या खिशात असलेल्या नोटांवरून आपल्या मनात अनेक विचार कायम येत असतात. खास करून कोणाकडूनही नोट घेताना आपण नोट फाटकी तर नाही ना, त्यावर काही लिहलेले नाही ना, याची पूर्ण खात्री करून स्विकारतो.

तर आपल्याकडे असलेली अशी फाटकी नोट देखील अनेक दुकानदार घेत नाहीत. चांगली नोट द्या, अशी मागणी दुकानदार देखील आपल्याकडे करतो. अर्थात यात काहीच चूकीचे नाही. मग फाटलेल्या नोटांचे करायचे काय, याबाबत आरबीआयने काय नियम सांगितले आहे.

जर तुमच्याकडे असलेल्या नोटावर कोणताही रंग लागला. आपल्याकडून ती नोट फाटली तर मग आपण काय करायला पाहीजे, असा प्रश्न पडतो. याबाबत आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया अशा नोटांबाबत काय सांगतो, याची माहिती आज आपण यातून घेणार आहोत.

देशात करन्सी जारी करण्याची जबाबदारी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियावर आहे. अधिनियम के कलम 22 अनुसार भारतात नोट जारी करण्याचा अधिकार आरबीआयला आहे. कायद्याच्या कलम 25 नुसार, नोटांची डिझाईन त्याचे स्वरूप हे रिझर्व्ह बॅंकेच्या केंद्रीय बोर्डाच्या संलाचक मंडळाच्या विचारानंतरच केंद्रसरकारच्या मान्यतेच्या अधिन असेल.

नोटांना जर रंग किंवा डाग लागलेला असेल तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया नुसार त्या तरीही या नोटा वैध आहेत. फक्त यामध्ये एकच अट आहे. त्या नोटांवर लिहलेला नंबर मात्र वाचता येण्यायोग्य असला पाहीजे. रिझर्व्ह बॅंकेचे म्हणणे आहे की, नोटेवर जर राजकीय किंवा धार्मिक स्वरूपाचा संदेश लिहलेला असेल तर अशा नोटा बदलता येणार नाही.

कट झालेली किंवा फाटलेली नोटेला तुम्ही कोणत्याही बॅंकेत जाऊन बदलू शकता. रिझर्व्ह बॅंकेच्या वतीने वेळोवेळी फाटलेल्या नोटासंदर्भात परिपत्रक जाहीर केलेले आहे. त्यामुळे तुम्ही फाटलेल्या नोटा सहज कोणत्याही बॅंकेत जाऊन बदलू शकता.

रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानुसार, एक व्यक्ती एका वेळी 20 नोटांपेक्षा जास्त नोटा बदलू शकत नाही. तसेच बदल करण्यासाठी आणलेल्या नोटांची एकूण किंमत ही पाच हजारांपेक्षा कमी असली पाहीजे. परंतू पूर्णपणे फाटलेली त्या नोटेचे तुकडे तुकडे झालेले असेल तर असे नोट बदलता येत नाही. नोटा बदलताना बॅंकेत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. ते तुम्ही सहज रित्या बदलू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *